स्तंभालेख Go Back आलेख कागदाची ओळख views 4:48 आलेख कागदाची ओळख जेव्हा दिलेली संख्यात्मक माहिती आलेख कागदावर स्तंभाच्या रुपात दाखवतात तेव्हा त्या स्तंभांना स्तंभालेख असे म्हणतात. तर चित्रांशिवाय माहिती दाखवायची असेल तर त्यासाठी आपल्याला आलेख कागदाचा वापर करावा लागेल. रवी:- बाई आलेख कागद कसा असतो? बाई :- हा आहे आलेख कागद. यावर काही ठळक व काही फिक्या रेषा असतात. ठळक रेषा एकक दाखवतात. आणि मोठ्या एककाचेच समान भाग करून मिळालेले लहान एकक फिक्या रेषांनी दाखवतात. या एककांमुळे योग्य प्रमाणात स्तंभाची उंची दाखवता येते. मिनू:- मोठे एकक व लहान एकक म्हणजे काय? बाई :- या कागदातील सेंटीमीटर अंतरावर असणाऱ्या रेषा मोठे एकक दर्शवतात आणि मिलीमीटर अंतरावर असणाऱ्या रेषा लहान एकक दर्शवतात. तसेच आलेख कागदावर साधारण खालच्या बाजूला पाया म्हणून एक आडवी रेषा असते तिला x ‘X’ अक्ष म्हणतात. आणि याच रेषेला काटकोन करणारी एक उभी रेषा कागदाच्या डाव्या बाजूला काढतात. तिला ‘Y’ अक्ष म्हणतात . आणि या दोन्ही अक्षांचा o हा छेदनबिंदू असतो. तसेच ज्या गोष्टींचा स्तंभालेख काढायचा आहे त्या गोष्टी x X अक्षावर समान अंतरावर दाखवतात. आणि त्या गोष्टी किती प्रमाणात दाखवायच्या आहेत त्या Y अक्षावर दाखवतात. प्रस्तावना आलेख कागदाची ओळख स्तंभालेख काढणे