त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म

त्रिकोणांचे प्रकार – कोनांवरून

views

4:37
त्रिकोणांचे प्रकार – कोनांवरून : आतापर्यंत आपण बाजूंच्या मदतीने त्रिकोण कसे ओळखायचे ते पाहिले. आता आपण कोनांवरून त्रिकोण कसे ओळखायचे ते पाहू लघुकोन त्रिकोण :-आपल्याला हे माहीतच आहे की 90० पेक्षा कमी माप असणाऱ्या कोनाला लघुकोन म्हणतात. म्हणून लघुकोन त्रिकोणाची व्याख्या आपल्याला अशी सांगता येईल की ज्या त्रिकोणाचे तीनही कोन लघुकोन असतात, त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात.” काटकोन त्रिकोण :- ज्या कोनाचे माप हे 90० असते. त्या कोनाला ‘काटकोन’ असे म्हणतात. म्हणून ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो, त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण म्हणतात” विशालकोन त्रिकोण:- ज्या कोनाचे माप 90० पेक्षा जास्त असते त्या कोनाला विशालकोन असे म्हणतात.” म्हणून “ज्या त्रिकोणाचा एक कोन विशालकोन असतो, त्या त्रिकोणास विशालकोन त्रिकोण असे म्हणतात.”