त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म

त्रिकोणाचे गुणधर्म

views

4:38
त्रिकोणाचे गुणधर्म :आतापर्यंत आपण त्रिकोणांचे प्रकार कसे ओळखायचे ते पाहिले. आता आपण या त्रिकोणांचे गुणधर्म कोणते आहेत ते पाहू. त्रिकोणाचा पहिला गुणधर्म म्हणजे त्रिकोणाच्या तीनही कोनाच्या मापांची बेरीज ही 180० असते.हे ओळखण्यासाठी आपण एक कृती करूया. प्रथम एक त्रिकोणाकृती कागद घ्या. या त्रिकोणाला आपण नाव देऊ त्रिकोण ABC. आता तिन्ही कोनांचे कोपरे दोन्ही बाजूंनी म्हणजे मागे व पुढे एकाच रंगाने रंगवा किंवा त्यावर वेगवेगळ्या खुणा करा. नंतर कोन A हा अशाप्रकारे दुमडा की त्याचे टोक बरोबर बाजू BC च्या मध्यावर येईल. आता त्रिकोणाचे उरलेले दोन कोपरेही मधोमध दुमडा. पहा ज्या ठिकाणी हे तीन कोन एकत्र आले आहेत त्या ठिकाणी तीन लघुकोन तयार झाले आहेत. आणि जर या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज केली तर ती 180अंश असेल. यावरून हे सिद्ध होते की त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज ही 180अंश असते.