समाजातील विविधता Go Back विविधता हीच आपली ताकद views 3:16 विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभवणे. म्हणजेच एकत्र राहण्याचा अनुभव घेणे. सहअस्तित्वामुळे आपल्यातील सामंजस्य वाढते. त्यामुळे एकमेकांच्या चालीरीतींशी आणि जीवन पद्धतींशी आपली ओळख होते. मुंबईमध्ये पहा, वेगवेगळ्या राज्यातील लोक कसे एकत्र वावरतात. एकमेकांच्या जीवन पद्धतीचा आदर करतात. इतरांच्या काही प्रथा – परंपरा आत्मसात करतात. त्यांचे उत्सव साजरे करतात. आपण सर्व ख्रिसमस साजरा करतो की नाही? एकमेकांना न्यू इयरच्या शुभेच्छा देतो की नाही? भरतनाट्यम ही नृत्यशैली दक्षिण भारतीय आहे. पण भरतनाट्यमच्या क्लासला जाणाऱ्या मुली फक्त तामिळनाडूच्या असतात का? नाही. तर, मराठी - गुजराती – पंजाबी मुलीही भरतनाट्यम शिकतात. सार्वजनिक गणेशोत्सवात सर्व भाषिक, सर्वधर्मीय लोक सहभागी होतात. केक कापून वाढदिवस साजरा करण्याची पद्धत आज सर्व गावागावांत स्वीकारली गेली आहे. म्हणजेच आपण एकमेकांच्या प्रथा – परंपरा आत्मसात करतो.आणि यातूनच समाजामध्ये एकोपा वाढतो. समाजातील एकोप्यामुळे आपण अनेक नैसर्गिक आपत्ती जसे पूर, ढगफुटी, भूकंप आणि सामाजिक आपत्तीं जसे दंगल, बॉम्बस्फोट यांचा सामना करू शकतो. अडचणीच्या वेळी एकमेकांना समजून घेतो. एकमेकांना मदत करतो. आपल्यात एकोपा असेल तर अशा गोष्टींचा आपण जिद्दीने सामना करू शकतो विविधता हीच आपली ताकद धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग, सहिष्णुता आणि सामंजस्य सहिष्णुता आणि सामंजस्य समाजाचे नियमन