समाजातील विविधता

सहिष्णुता आणि सामंजस्य

views

3:43
सहिष्णुता आणि सामंजस्यविषयी जाणून घेऊया. कोणताही समाज हा त्यातील व्यक्ती आणि त्या समाजातील परस्पर सहकार्य यावर अवलंबून असतो. व्यक्ती – व्यक्तींमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात येऊ शकत नाही. त्यामुळे व्यक्ती आणि व्यक्तींचे समूह बहुतेक वेळी एकमेकांशी जुळवून घेऊनच आपापले व्यवहार करीत असतात. सहकार्य, आणि सहभागामुळेच समाजात व्यक्तिव्यक्तींमधील एकोपा टिकून राहतो. परस्परांच्या अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी परस्परांना मदत करणे म्हणजे सहकार्य होय. एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती नसेल तर जसे आपले कुटुंब टिकू शकत नाही तसेच समाजाचे आहे. सहकार्याअभावी आपला विकास रखडेल. दैनंदिन जीवनही सुरळीत चालणार नाही. सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते. सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ती एक प्रक्रिया आहे. ग्रामसभेमध्ये गावातील सर्वधर्मीय, सर्वभाषिक लोक एकत्र येऊन शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा या महत्त्वाच्या कामांविषयी निर्णय घेतात आणि ते अंमलात आणतात, म्हणून गावाचा विकास होतो. आपल्या समाजातील दुर्बल व वंचित घटकांना आणि मुलींना शिक्षण घेण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी आपण सहकार्य केले पाहिजे.