Using Digital Devices

Usage of Web Camera

views

01:53
आपण आपल्या मित्रांसोबत किंवा नातेवाइकांसोबत फोनवर नेहमीच बोलतो. परंतु दूर राहणाऱ्या मित्राशी प्रत्यक्ष चेहरा पाहून बोलायचे असेल तर? व्हिडीओ कॉन्फरंसच्या द्वारे हे शक्य होते. संगणक व इंटरनेटच्या मदतीने आपल्याला व्हिडिओ कॉन्फरंस करता येते. त्यासाठी याकरिता आपल्या संगणकाला वेब कॅमेरा जोडावा लागेल. वेब कॅमेरा हा एक इनपुट डिव्हाइस आहे. यामध्ये एक लहानशी लेन्स असते. या लेन्समधून कॅमेऱ्यासमोर जे दिसते ते एका केबलद्वारे संगणकामध्ये डिजिटल स्वरुपात नेले जाते. ते मॉनिटरवर आपल्याला दृश्य स्वरुपात दिसते. “१९९१ मध्ये कॅम्ब्रीज युनिवर्सिटीच्या कॉम्पुटर सायन्स डिपार्टमेंटमध्ये पहिला वेब कॅमेरा वापरण्यात आला. त्याला कॉपी कॉम असे नाव देण्यात आले होते.