हवा आणि हवामान

हवा, हवामान

views

4:31
हवा व हवामान याची माहिती घेण्यापूर्वी प्रथम आपण हवा म्हणजे काय हे पाहू. व्याख्या: एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा होय. ही हवा कधी थंड असते, कधी गरम, कधी दमट तर कधी कोरडी. हवेची ही स्थिती आपण अनेकदा अनुभव असतो आणि तीव्हे वर्णन करीत असतो. तुम्ही वेगवेगळ्या ऋतूंत वेगवेगळी जीवनपद्धती जगता. म्हणजे उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या ऋतूंनुसार तुम्ही जीवनपद्धतीत बदल करता. 1. पाऊस पडत असेल त्यावेळी रेनकोट, छत्री, गमबूट या साधनांना उपयोग. 2.उन्हाळ्यात सुती कपडे वापरता. तसेच वेगवेगळे गॉगल्स घालता. टोपी घालता. थंड पेय, थंड पदर्थ खाता. 3.हिवाळ्यात लोकरीचे कपडे वापरता रात्री दोन दोन पांघरुणे घेऊन झोपता. अशा अनेक गोष्टी त्या- त्या ऋतूत करत असतो. वर्षाच्या कोणकोणत्या महिन्यांमध्ये हे ऋतू असतात तुम्हाला माहित आहे का? पहा तर उन्हाळा हा फेब्रुवारी, मार्च, एर्प्रिल आणि मे या महिन्यात असतो. पावसाळा जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात असतो. तर हिवाळा हा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यात असतो. म्हणजेच एका ऋतूत साधारणपणे ४ महिने असतात. आणि याच ४ महिन्यात आपण त्या ऋतू चा अनुभव घेत असतो.