हवा आणि हवामान

हवेची अंगे

views

3:46
हवेची एकूण पाच अंगे (घटक) आहेत त्याविषयी जाणून घेऊ. १) तापमान:- आपली पृथ्वी हा ग्रह आहे. तिला प्रकाश किंवा ऊर्जा सूर्यापासून मिळते. सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग म्हणजे पृथ्वीवरील जमिनीचा भाग तापतो. पृष्ठभाग तापल्यानंतर त्याच्या जवळ किंवा भूपृष्टावर वाहणारी हवासुद्धा तापते. भूपृष्ठालगतची हवा तापल्यानंतर हवेचे वरचे ठार क्रमाक्रमाने तापतात. त्यामुळे समुद्रसपाटीपासून जस – जसे वरवर जाऊ तास तसे हवेचे तापमान कमी होत जाते. 2.) वायुदाब:- हवेला वजन असते. त्यामुळे हवेचा दाब निर्माण होतो. त्याला वायुदाब म्हणतात. वातावरणाच्या सर्वात खाली असणाऱ्या हवेच्या थरांवर वरील हवेच्या थरांचा दाब पडतो. त्यामुळे हवेची घनता वाढते. म्हणजे वजन वाढते. 3.) वारे: वाहणाऱ्या हवेला वारा असे म्हणतात. किंवा जास्त वायुदाबाकडून कमी वायूदाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेत वाहू लागते, त्यास वर असे म्हणतात. वायुदाबातील फरक जेथे कमी असेल, तेथे वारे मंद गतीने वाहतात. वाऱ्याची दिशा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे असते, त्यामुळे वाऱ्याच्या दिशेत बदल होत असतात. वाऱ्याचा वेग कमी प्रती तास या परिमाणात मोजतात. वारा कोणत्या दिशेकडून वाहतो हे आपल्याला वातदिशादर्शकाच्या सहाय्याने समजते. ४.) आर्द्रता:- पावसाळ्यातील हवा. हवेतील दमटपणास आर्द्रता म्हणतात. आर्द्रता म्हणजे पाऊस येण्याआधी असलेली हवेतील ओलावा. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते. जेथे जास्त तापमान असते तेथे जास्त बाष्प मावते. ५.) वृष्टी:- वृष्टीची निर्मिती कशी होते ते आता बघू. पावसाचे पाणी- ओढे, नद्या, नाले यांच्यामार्फत समुद्रास जाऊन मिळते. समुद्रातील पाण्याची सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते. वाफेचे बाष्पात रुपांतर होते. ते बाष्प वाऱ्याबरोबर वाहत जाऊन एकत्र होते. त्या जलयुक्त कणांपासून ढग बनतात. त्या ढगांना थंड हवा लागली की त्यांचे पावसात किंवा हिम, गारा यांच्यात सुपान्त्र होते. परत पाण्याच्या रुपात समुद्रास मिळतात.