तापमान Go Back जमीन व पाणी यातील तापमानाची असमानता views 4:59 जमीन व पाणी दोन्ही तापणे व थंड होणे यात समानता आढळत नाही हे समजून घेण्यासाठी आपण एक प्रयोग करू. समान आकाराची दोन भांडी घेऊन त्यात सारखेच प्रमाण असलेले पाणी भरून घ्या. त्याच्यातील एक भांडे घरातच ठेवा आणि दुसरे भांडे सूर्योदयाच्या वेळेस अशा पद्धतीने घराबाहेर ठेवा की त्या भांड्यावर सतत सूर्यकिरणे पडली पाहिजेत. नंतर दुपारी जास्त उन्हाच्या वेळी घरातल्या जमिनीवर अनवाणी म्हणजे चप्पल न घालता चालून जमिनीच्या तापमानाचा अंदाज घ्या. तसेच घरातील भांड्यातील पाण्यात हात घालून पाण्याच्या तापमानाचा अंदाज घ्या. हीच क्रिया घराबाहेरील जमिनीच्या बाबतीत व भांडे भरून ठेवलेल्या पाण्याच्या बाबतीतही करा. म्हणजेच अनवाणी घराबाहेर चालून पहा आणि घराबाहेरच्या भांड्यातील पाण्यात हात घालून पाण्याच्या तापमानाचा अंदाज घ्या. या दोन्ही प्रकारच्या तपमानांची नोंद वहीत करून ठेवा. हा सकाळी केलेला जमीन व पाण्याच्या तापमानाचा प्रयोग आता सायंकाळी सात वाजता पुन्हा करुन पहा आणि त्यांच्या तापमानाची नोंदही निरीक्षण वहीत लिहून ठेवा. आणि पहा नेमका काय बदल घडून आला आहे.या प्रयोगावरुन आपल्या असे लक्षात आले की, जमीन लवकर तापली व लवकर थंड झाली. परंतु, उन्हात ठेवलेले पाणी थोडेसे कोमटच राहिले. जमीन व पाणी यांच्या तापण्याच्या व थंड होण्याच्या या फरकामुळे जमिनीवरील हवा लवकर तापते व लवकर थंड होते. तर पाण्यावरील हवा उशिरा तापते आणि उशिरा थंड होते. त्यामुळेच समुद्रकिनारी भागात हवेचे तापमान खडांतर्गत भागाच्या तुलनेत दिवसा कमी असते, तर रात्री जास्त असते. याउलट खडांतर्गत भागात किनारी भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा जास्त असते तर रात्री कमी असते. समुद्र किनारी भागात समुद्राचे पाणी तापल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होते. व पाण्याची वाफ हवेत मिसळते. पाण्याची वाफही हवेतील तापमान साठवू शकते. त्यामुळे या भागातील हवा आर्द्र व उबदार राहते. म्हणजेच दमट असते, गरम असते. तर त्याच्या अगदी उलट परिस्थिति जमिनीवरील भागात असते. त्या ठिकाणी बाष्प नसल्याने हवा कोरडी असते त्यामुळे तापमानातील फरक हे तीव्रतेने म्हणजेच वेगाने व पटकन होतात. दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा म्हणतात. पृथ्वीवर पडणारी सूर्याची किरणे तापमानाचे असमान वितरण जमीन व पाणी यातील तापमानाची असमानता उष्णतेचे वहन व ऊर्ध्वप्रवाह समताप रेषा तापमापक