तापमान

उष्णतेचे वहन व ऊर्ध्वप्रवाह

views

2:42
उष्णतेचे वहन व ऊर्ध्वप्रवाह कसे होते हे प्रयोगाद्वारे पाहूया. एका भांड्यात पाणी तापत ठेवलेले आहे. त्या भांड्यात चार-पाच शर्टची प्लास्टिकची बटने टाकली आहेत. आता बटनांची हालचाल कशा प्रकारे होते ते पाहू. पाणी तापेल तशी बटने वर – खाली होत आहेत. पाणी तापल्यावर प्रसरण पाऊन तळाकडील जास्त गरम पाणी वर येते. त्या गरम पाण्या बरोबर बटणेही पाण्याच्या पृष्ठ भागावर येतात. त्याप्रमाणे वरचे जे थंड पाणी आहे ते वजनाने, गरम पाण्याच्या तुलनेत जड असते. म्हणून ते खाली जाऊ लागते आणि त्याबरोबर बटनेही खाली जातात. असे पाणी तापल्याने पाण्यात ऊर्ध्वगामी प्रवाह तयार होतात. जमिनीवरील हवा लवकर तापून लवकर थंड होते, तर पाण्यावरील हवा उशिरा तापून उशिरा थंड होते. परिणामी किनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी तर रात्री जास्त असते. तापमानात होणाऱ्या फरकामुळे महासागरामध्ये पाण्याचे ऊर्ध्वगामी (वरच्या दिशेने) तसेच क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होतात. क्षितिज म्हणजे ज्या ठिकाणी जमीन व आकाश एक झाले आहे, असा भास होतो ती रेषा. तर हे क्षितिज समांतर प्रवाह तापमानात होणाऱ्या फरकाप्रमाणे पाण्याच्या घनतेत म्हणजेच वजनात झालेला बदल व वारे यामुळे निर्माण होतात. हे सागरी प्रवाह विषुववृत्ताकडून ध्रुवांकडे व ध्रुवांकडून विषुववृत्ताकडे वाहतात. हे सागरी प्रवाह जेव्हा शीत कटिबंधाकडून म्हणजेच थंड प्रदेशातून उष्ण कटिबंधाकडे येतात, म्हणजेच ध्रुवांकडून विषुववृत्ताकडे येतात, त्यावेळेस उष्ण कटिबंधातील किनारपट्टीचे तापमान शीत प्रवाहामुळे कमी होते. तर याउलट उष्ण कटिबंधाकडून शीत कटिबंधाकडे, म्हणजेच विषुव वृत्ताकडून ध्रुवांकडे जातात तेंव्हा तेथील किनारपट्टीचे तापमान उष्णतेमुळे वाढते.