नैसर्गिक संसाधने

नैसर्गिक संसाधने– खनिजे

views

3:03
दगड म्हणजेच खनिजांचे मिश्रण. प्रथम आपण खनिजे म्हणजे काय हे पाहू. रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गतः तयार झालेले जे अजैविक पदार्थ असतात, त्यांनाच खनिजे असे म्हणतात. लोह, मँगनीज, सोने इत्यादी खनिजे जमिनीमध्ये असतात. ह्या खनिजांचा उपयोग कारखान्यांमध्ये, घरगुती वापरासाठी, तसेच दागिने व शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो. या खनिंजापासून आपल्याला विविध धातू तसेच रसायने मिळतात. काही रसायनांचा उपयोग औषधे तयार करण्याकरता होतो. ज्या खनिजांपासून धातू मिळतात त्यांना धातू खनिज म्हणतात. ज्या खनिजांपासून धातू मिळत नाहीत त्यांना अधातू खनिजे म्हणतात. विविध प्रकारचे धातू मिळवण्यासाठी धातू खनिजांचा उपयोग केला जातो. उदा.लोह, बॉक्साईट इत्यादी. तर अधातू खनिजांचा वापर विविध रसायने तयार करण्यासाठी केला जातो. उदा.- जिप्सम, सैंधव, कॅलसाईट इत्यादी. आपल्या दैनंदिन वापरातील कितीतरी वस्तू अशा धातूंपासूनच बनलेल्या असतात. जसे, जेवणासाठी लागणारे ताट-वाटी, देव्हा-यात पूजेसाठी वापरले जाणारे ताम्हण, समई, पोळ्या भाजायचा तवा, तसेच दागिने इत्यादी. अश्या धातूंपासून बनलेल्या कितीतरी वस्तू आपल्या घरात असतात. वाहनांसाठीही धातूचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. महाराष्ट्रात सापडणार्‍या प्रमुख खनिजांची माहिती पुढे दिली आहे. तसेच ती खनिजे ज्या प्रमुख जिल्ह्यांत सापडतात त्या जिल्ह्यांचीही माहिती दिली आहे.