नैसर्गिक संसाधने

नैसर्गिक संसाधने जमीन

views

3:27
जमीन हे सुद्धा एक नैसर्गिक संसाधन आहे. शेतीकाम, मध गोळा करणे, डिंक गोळा करणे, लाकडे गोळा करणे, खाणकाम, गवंडीकाम, प्राण्यांद्वारे माल वाहतूक ही सारी कामे माणूस जमिनीवर राहूनच करत असतो. म्हणूनच जमिनीला नैसर्गिक संसाधन म्हटले आहे. भू-पृष्ठावर जन्माला येणाऱ्या बहुतेक सजीवांची वाढ, वास्तव्य आणि मृत्यू जमिनीवरच होत असतो. आणि म्हणूनच जमीन या संसाधनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जमीन या संसाधनाचा वापर स्थावर मालमत्ता म्हणूनही केला जातो. यात जागा खरेदी-विक्री, मोक्याची जागा मिळवणे, बांधकाम करणे, व्यापारासाठी जागा वापरणे, इत्यादींसाठी सुद्धा केला जातो. अशाप्रकारे विविध कारणांसाठी जागेचा वापर करत असताना तिची भौगोलिक रचना म्हणजेच तिचा उंचसखलपणा, त्या प्रदेशातील मृदा, तेथील हवामान, खनिजे आणि पाण्याची उपलब्धता या घटकांचा विचार करणे ही आवश्यक असते. पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण २९.२०% एवढे आहे.जमीन व हवामानाच्या वैशिष्टयांनुसार जगाच्या विविध भागांत विविध प्रकारचे सजीव कमी अधिक संख्येने आढळून येतात. मानवासह सर्व सजीवांचे हे वितरण असमान असते. जमिनीचा खडकाळपणा, तीव्र उतार, सपाट मैदाने, पर्वतीय प्रदेश, जंगलव्याप्त प्रदेश, नद्यांची खोरी, सागरी किनारे अशा विविध भौगोलिक परिस्थितींशी जुळवून घेत सर्व सजीव राहत असतात.