मानवाचे व्यवसाय

प्रस्तावना मानवाचे व्यवसाय

views

4:04
मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या ते आपल्याला माहीत आहेच. अन्न, वस्त्र, निवारा, आणि शिक्षण या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. मानवाची सर्वप्रथम गरज अन्न आहे. आणि प्राचीन काळी अन्नाची गरज भागविण्यासाठी मानव परिसरातील फळे, कंदमुळे गोळा करीत असे. प्राणी, पक्षी, मासे, इत्यादींची तो शिकार करीत असे. त्याचबरोबर उपजीविकेसाठी काही प्राण्यांची व वनस्पतींचीही जोपासना करीत असे. यातूनच मानव वेगवेगळे व्यवसाय करू लागला. त्यामुळे कमी-जास्त प्रमाणात उत्पादित होणाऱ्या पदार्थांची एका प्रदेशाकडून दुसऱ्या प्रदेशाकडे वाहतूक सुरू झाली. यातून वस्तूंच्या व्यापाराची सुरुवात झाली. वस्तुनिर्मिती, वाहतूक, व्यापार इत्यादींसाठी विविध सेवा निर्माण झाल्या. मानवाच्या या कृतीतून विविध व्यवसायांची निर्मिती झाली. त्याच मानवी व्यवसायांची माहिती आपण या पाठात घेणार आहोत.