मानवाचे व्यवसाय

मनुष्यबळाचे शेकडा प्रमाण

views

2:58
व्यवसायांचे वर्गीकरण व विविध व्यवसायांतील मनुष्यबळाचे शेकडा प्रमाण याविषयी जाणून घेऊया. मानवी व्यवसायाचे वर्गीकरण कशा प्रकारे करतो हे आपण पाहिले. जगातील सर्वच देशांमध्ये या चार व्यवसायांपैकी कोणता ना कोणता व्यवसाय चालतो. या व्यवसायांमधूनच देशाची किंवा दोन देशांदरम्यान होणारी आर्थिक उलाढाल होते. म्हणजे पैशाची देवाण-घेवाण व्यवसायांतून होते. त्यातून त्या देशाचे विविध वस्तूंचे उत्पादन किती आहे हे कळते . देशाचे आर्थिक उत्पादनही कळते. यातूनच एखादा देश इतर देशांपेक्षा विकसित आहे, अविकसित आहे की विकासाच्या मार्गावर म्हणजे विकसनशील आहे हे कळते. ज्या देशातील जास्त मनुष्यबळ तृतीयक व्यवसायात कार्यरत असते. त्यांना विकसित देश म्हणतात. तर प्राथमिक व्यवसायात जास्त मनुष्यबळ प्रमाण असलेले देश विकसनशील देश म्हणून ओळखले जातात.