रोमन संख्याचिन्हे

प्रस्तावना

views

2:41
प्रत्येक भाषेची स्वतंत्र अशी लिपी असते. त्या लिपीनुसार त्या भाषेत अक्षरे, अंकांचा उपयोग केला जातो. आपण भारत देशात राहतो. भारत हा बहुभाषिक देश आहे. इथे प्रत्येक राज्यात वेगळी भाषा आहे. उदा. महाराष्ट्र, गुजरात इत्यादी. प्रत्येक ठिकाणच्या भाषेनुसार तिथे अंकांचा वापर केला जातो. आपण संख्येचे वाचन करण्यासाठी देवनागरी व आंतरराष्ट्रीय लिपीचा उपयोग करत असतो. खालील तक्त्यावरून आपल्या लक्षात येईल की देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्या लेखनात काय फरक आहे ते ! देवनागरी ० १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ आंतरराष्ट्रीय 0 1 2 3 4 5 6 7 8 9 आज आपल्याला रोमन अंकांचा अभ्यास करायचा आहे. रोमन संख्यांचा वापर रोमन साम्राज्याच्या अस्तानंतरही चालू आहे. १४ व्या शतकानंतर रोमन संख्यांची जागा हिंदू, अरेबियन संख्यांनी घ्यायला सुरुवात झाली. रोमन आकड्यांची पद्धत जरी कालबाह्य असली तरीही आज ह्या रोमन संख्यांचा वापर दैनंदिन जीवनात होतो. पूर्वी युरोपमध्ये संख्यालेखनासाठी कँपिटल रोमन अक्षरे वापरली जात. म्हणून संख्या लिहिण्याच्या या पध्दतीला रोमन संख्या लेखन पध्दती असे म्हणतात. आता आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांसाठी कोणत्या रोमन अंकांचा वापर करतात ते पाहू या.आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे :- 1 5 10 50 100 500 1000 रोमन संख्याचिन्हे :- I V X L C D M रोमन संख्या पद्धतीत शून्यासाठी कोणतेही चिन्ह वापरले जात नाही.