Slide Developing

Transition Effect

views

01:33
स्लाईड मेकिंगमध्ये आपण स्लाईडवरील ऑब्जेक्टसच्या विविध प्रकारे हालचाली दाखविण्यासाठी ‘कस्टम अॅनिमेशन’ चा उपयोग केला. प्रभावी सादरीकरणामध्ये ऑब्जेक्टस् प्रमाणे स्लाईडलासुद्धा विविध इफेक्ट्स द्याव्या लागतात. यासाठी ट्रांन्झिशन या कमांडचा उपयोग होतो. स्लाईड शोचा वेळ, स्लाईड स्क्रीनवर कशी प्रकट व्हावी, तसेच ती किती वेळ स्क्रीनवर राहावी हे निश्चित करण्याकरिता ट्रांन्झिशनचा उपयोग करतात. एका सादरीकरणामध्ये वेगवेगळया स्लाईडसनां वेगवेगळे ट्रांन्झिशन इफेक्ट देता येतात. पण व्यावसायिक सादरि‍करणामध्ये शक्य तो एकाच प्रकारचे ट्रांन्झिशन इफेक्ट देण्याचे सुचविले जाते.