दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये

प्रस्तावना

views

3:36
आज आपण दक्षिण भारतातील प्राचीन राज्यांची माहिती घेणार आहोत. सातवाहन, राष्ट्रकूट, वाकाटक, चालुक्य, चेर, चोळ, पांड्य, पल्लव इत्यादी राज्यांची माहिती घ्यावयाची आहे.चेर, पांड्य आणि चोळ राजघराणी : चेर हे प्राचीन केरळचे नाव होते. त्यामध्ये सध्याच्या केरळ राज्यातील त्रावणकोर, कोचीन, मलबार, कोयंबत्तुर आणि सलेम या जिल्ह्यांचा समावेश होतो. द्रविड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेर, पांड्य आणि चोळ ह्या दक्षिण भारतातील प्राचीन राजसत्तांमधील प्रमुख होत्या. रामायण व महाभारत या भाषेतील संघम साहित्यात या तीन राजसत्तांविषयी माहिती दिली आहे. तुम्हांला प्रश्न पडला असेल की संघम साहित्य म्हणजे काय? तर संघम म्हणजे विद्वान साहित्यिकांची सभा. साहित्यिक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन करणारे लोक होय. निबंध, काव्य, महाकाव्य, नाटक, इत्यादी लिहिणारे लोक. तर अशा सभांमध्ये एकत्रित केलेले साहित्य म्हणजे ‘संघम साहित्य’ होय. हे साहित्य तमिळ भाषेतील प्राचीन साहित्य आहे. तर या साहित्यातून दक्षिण भारतातील चेर, पांड्य, चोळ या राजसत्तांविषयी माहिती मिळते. तसेच सम्राट अशोकाने जे शिलालेख खोदले आहेत. त्यांमध्ये सुद्धा या तीन राज्यांविषयीची माहिती आहे.