दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये

वाकाटक राजघराणे

views

5:0
वाकाटक राजघराणे: इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाच्या सुरुवातीसच सातवाहनांची सत्ता कमजोर व प्रभावहीन झाली. त्यानंतर वाकाटक सत्ता उदयास आली. तिसऱ्या शतकापासून ते सहाव्या शतकापर्यंत या घराण्याने आपली सत्ता अबाधित ठेवली होती. वाकाटक घराण्याचा संस्थापक विंध्यशक्ति हा होता. विंध्य शक्ति नंतर पहिला प्रवरसेन हा वाकाटक साम्राज्याचा राजा झाला. प्रवरसेन राजाच्या काळात दुसरा कोणत्याही राज्याचा राजा शक्तिशाली नसल्याने प्रवरसेनाने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला. चौथ्या शतकाच्या सुरुवातीस प्रवरसेनाने पूर्व व दक्षिण भारत, माळवा, गुजरात, काठीयावाड हे प्रदेश जिंकून घेतले होते. प्रवरसेनाच्या काळात त्याचे राज्य उत्तरेस माळवा आणि गुजरात या प्रदेशांपासून दक्षिणेस कोल्हापूर पर्यंत पसरले होते. कोल्हापूरचे त्याकाळातील नाव कुंतल असे होते. हे निश्चित आहे की प्रवरसेनच्या काळातच वाकाटकाचे राज्य हे खऱ्या अर्थाने साम्राज्यात रुपांतरित झाले. प्रवरसेनानंतर वाकाटकांचे राज्य विभागले गेले. त्यातील दोन शाखा/विभाग प्रमुख होत्या. पहिल्या शाखेची राजधानी आजच्या नागपूरजवळील नंदीवर्धन येथे होती. तर दुसऱ्या शाखेची राजधानी सध्याच्या वाशीम जिल्ह्यात म्हणजे पूर्वीच्या वत्सगुल्म येथे होती.