समीकरणे

समीकरण सोडवणे

views

3:43
समीकरण सोडवणे : मुलांनो आता आपण समीकरणातील अक्षराची म्हणजे चलाची किंमत आणि समीकरणाची उकल कशी काढायची ते पाहू. तुम्हाला तर माहीतच आहे की, समीकरणाची तुलना आपण संतुलित तराजूशी करू शकतो. मग आपण हे तराजूचेच उदाहरण सोडवू. समीकरणाच्या दोन बाजू म्हणजे तराजूची दोन पारडी असतात! समजा : शि: तराजूच्या एका पारड्यात एक पेरू व तीन बोरं आहेत. दुसऱ्या पारड्यात सात बोरं आहेत. तो तराजू समतोल आहे. तर एका पेरुचं वजन किती असेल? वि : पेरूचे वजन समजण्यासाठी प्रथम पेरूबरोबर असलेली 3 बोरं काढू. ही बोरं काढल्याने पेरू असलेलं पारडं, 7 बोरांच्या पारड्यापेक्षा हलकं झालं. आणि डावीकडील पेरुचं पारडं वर जाईल व उजवीकडील 7 बोरांच पारडं खाली येईल. म्हणून मग उजवीकडील 7 बोरांच्या पारड्यातील एक एक बोर काढून टाकू. या पारड्यातील 3 बोरं काढू तेव्हा तराजू संतुलित होईल. म्हणजे एका पेरूचे वजन हे 4 बोरांच्या वजनाइतके आहे हे समजले. शि: अगदी बरोबर ! मुलांनो, हे लक्षात ठेवा की, ज्याप्रमाणे पेरुचं वजन समजण्यासाठी आपण पेरू बरोबर असलेली 3 बोरं काढून टाकली आणि दुसऱ्या पारड्यातलीही 3 बोरं काढून टाकली, त्याचप्रमाणे समीकरण सोडवताना, म्हणजेच समीकरणाची उकल काढताना, चलाबरोबर असणारी दुसरी संख्या काढून टाकण्यासाठी चल व दुसरी संख्या यांत जी क्रिया असेल त्याच्या विरुद्ध क्रिया करावी लागते. आणि जी क्रिया समीकरणाच्या एका बाजूला करतो, तीच क्रिया समीकरणाच्या दुसऱ्या बाजूलाही करावी लागते. कारण पहिले समीकरण जर संतुलित असेल तरच अशा क्रियेतून मिळणारे नवीन समीकरणही संतुलित मिळते.