समीकरणे

चलाची किंमत शाब्दिक उदाहरणे

views

3:41
आतापर्यंत आपण समीकरण म्हणजे काय? चलाची किंमत कशी काढायची, त्याची उकल कशी काढायची हे पाहिले आहे. त्यावर आधारित काही समीकरणे सोडवली आहेत. पण आता आपण काही शाब्दिक उदाहरणे सोडवू. उदा. 1 : समजा समीरचे वय 5 वर्षांपूर्वी 9 वर्षे होते. तर त्याचे आजचे वय किती असेल? पहा, प्रथम आपण समीरचे वय ‘ x’ असे मानू. यावरील आपले समीकरण होईल : x – 5 = 9 आणि -5 च्या विरुद्ध क्रिया आहे +5. म्हणून दोन्ही बाजूंना +5 मिळवू. म्हणून x – 5 + 5 = 9 + 5 म्हणून x = 14 म्हणून समीरचे आजचे वय 14 वर्षे आहे. उदा 2. समजा, पेढ्यांच्या बॉक्स मध्ये काही पेढे आहेत. त्यातील 20 मुलांना प्रत्येकी 2 पेढे वाटले. तर त्या बॉक्स मध्ये एकूण किती पेढे असतील? आता हे गणित तुम्ही सोडवून दाखवा. वि: सर, प्रथम आपण बॉक्स मधील पेढे p मानू. मग आपले समीकरण होईल: p= 20 . आणि भागिले 2 च्या विरुद्ध क्रिया आहे × 2. म्हणून दोन्ही बाजूंना 2 ने गुणू, म्हणून 2 P × 2 = 20 × 2 म्हणून P = 40, म्हणून बॉक्स मध्ये एकूण 40 पेढे होते. शि: अगदी बरोबर! 2 उदा: 3. 5 चॉकलेटची किंमत 25 रुपये आहे. तर एका चॉकलेटची किंमत किती?कोण सोडवेल हे गणित. वि: सर आपण प्रथम चॉकलेटची किंमत k मानू. म्हणून आपले समीकरण होईल: 5 k = 25 . आणि 5 k म्हणजेच. k × 5. गुणिलेच्या विरुद्ध क्रिया आहे भागिले. म्हणून दोन्ही बाजूंना 5 ने भागू. म्हणून 5 k = 25 5 5 5 म्हणून k = 5. म्हणून एका चॉकलेटची किंमत 5 रुपये आहे. शि: अगदी बरोबर!