शेकडेवारी

प्रस्तावना

views

2:21
शेकडेवारी आज आपल्याला गणितातील एक नवा घटक शिकायचा आहे, तो म्हणजे शेकडेवारी. सर्वप्रथम आता शेकडेवारी म्हणजे काय हे नीट समजून घेऊया. आपल्याला %(टक्के) अशी खूण दिसते आहे. ही खूण शेकडेवारीची आहे. शेकडा म्हणजे शंभर. शेकडेवारीला टक्केवारी किंवा शतमान पद्धत असे देखील म्हणतात. पहा, पहिल्या चित्रात आपल्याला मोबाइल फोनची बॅटरी दिसते आहे. आणि ही बॅटरी 43% चार्ज झाली आहे असे दिसते आहे.43% म्हणजे 100 पैकी 43 भाग असा अर्थ होतो. तसेच हे चित्र पहा. या धरणामध्ये 58% पाणी शिल्लक आहे असे दिसते आहे. म्हणजे इथे देखील किती पैकी 58% असतील सांगा बरं? वि: सर 100 पैकी 58%. शि: अगदी बरोबर. जर मी म्हटले की धरणात एकूण अर्धा भागच पाणी शिल्लक राहिले आहे, तर ते किती टक्के होतील? वि: सर 100 च्या अर्धे म्हणजे 50. म्हणजेच एकूण 50% पाणी धरणात शिल्लक असेल. शि: शाब्बास! जर मी म्हटले धरणात पाव भागच पाणी शिल्लक आहे,तर त्यात किती % पाणी शिल्लक असेल? वि: सर 100 च्या पाव भाग म्हणजे 25. म्हणून धरणात एकूण 25% पाणी शिल्लक असेल. शि: फारच छान. म्हणजे तुम्हाला आता कळले आहे की जेव्हा आपण एखादी संख्या शेकडेवारीत लिहितो तेव्हा तो भाग 100 भागांपैकी तेवढे भाग असतो.