भौमितिक रचना

लंबदुभाजक

views

3:23
लंबदुभाजक: मुलांनो, तुम्ही बैलगाडी पाहिली असेलच. बैलगाडी ओढण्यासाठी “जू” या लाकडी भागाचा वापर करतात. बैलगाडीला हे जू बसवण्यासाठी बैलगाडीच्या कण्याच्या दोन्ही टोकांपासून दोरीने समान अंतर घेतले जाते. म्हणजेच या ठिकाणी लंबदुभाजकाचा नियम वापरला जातो. अशा या लंबदुभाजकाची माहिती आपण आता घेणार आहोत. रेषाखंडाचा लंबदुभाजक : रेषाखंडाचा लंबदुभाजक कसा काढायचा ते आपण एक आकृतीच्या मदतीने समजून घेऊ. (पान क्र. 91 पहा ) यासाठी ही आकृती पहा. या आकृती मध्ये रेख AB दाखवली आहे . तसेच रेषा P व q ही दिसत आहेत. आणि या दोन्ही रेषा रेख AB च्या M बिंदूतून जातात. म्हणून त्या रेख AB च्या दुभाजक आहेत. आता जर तुम्ही नीट निरीक्षण केलेत तर तुम्हाला कळेल की रेषा P पासून तयार झालेले सर्व कोन हे काटकोन आहेत. म्हणून रेषा P ही रेख AB ला लंब दुभाजक आहे. पण पहा, रेषा q पासून होणारा कोणताही कोन हा काटकोन नाही. म्हणून रेषा q ही रेख AB ला लंब दुभाजक नाही. म्हणजेच कोणतीही रेषा लंबदुभाजक असण्यासाठी तिच्यापासून तयार होणारे कोन हे काटकोनच असले पाहिजेत हे आपल्याला या आकृतीवरून समजते. कंपासाच्या साहाय्याने रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे. : चला मुलांनो, आता आपण हा लंबदुभाजक कंपासच्या साहाय्याने काढू, (पान क्र. 91 पहा ) कंपासाच्या साहाय्याने लंब दुभाजक काढताना सर्वप्रथम एक रेषाखंड AB काढा. आता कंपासचे टोक बिंदू A वर ठेवा. या कंपासामध्ये A व B या दोन बिंदूंमधील अंतराच्या निम्यापेक्षा जास्त अंतर घेऊन रेषाखंडाच्या वरच्या व खालच्या बाजूला कंस काढा. आता कंपासमध्ये तेच अंतर ठेवून कंपासचे टोक B बिंदूवर ठेवा. आणि पूर्वीच्या कंसांना छेदणारे कंस काढा. रेषाखंडाच्या वरील भागातील कंसाच्या छेदनबिंदूला P हे नाव द्या. आणि रेषाखंडाच्या खालील भागातील कंसाच्या छेदनबिंदूला Q हे नाव द्या. आता दोन्ही कंसाच्या छेदन बिंदूंमधून म्हणजेच बिंदू P व बिंदू Q मधून रेषा PQ काढा. पहा रेषा PQ ही रेख AB ला लंबदुभाजक दिसत आहे. कारण रेषा PQ आणि रेषा ABAB यामुळे तयार झालेले सर्व कोन हे काटकोन आहेत.