भौमितिक रचना

कार्ल गाऊसची युक्ती

views

2:04
कार्ल गाऊसची युक्ती : मुलांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे कार्ल फ्रेडरिक गाऊस या प्रख्यात गणितीच्या बालपणाची. एकदा कार्लच्या वर्गातील मुले खूप गडबड करत होती. त्यांना कामात गुंतवावे म्हणून शिक्षकाने त्यांना 1 पासून 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायला सांगितली. कार्लने ती बेरीज दोन – तीन मिनिटांत केली आणि तो हातांची घडी घालून शांत बसला. इतर मुले मात्र शिक्षकांच्या धाकाने खूप आकडेमोड करत बसली. कार्लला शांत बसलेले पाहून शिक्षक त्याला म्हणाले ‘अरे नुसताच काय बसला आहेस, त्यापेक्षा बेरीज कर!’ त्यावर कार्लने केलेली बेरीज त्याच्या शिक्षकांना दाखवली. ती बेरीज पाहून शिक्षक अचंबित झाले. त्याच्यावर खूष झाले आणि त्याला शाबासकी दिली. त्याने ती बेरीज इतक्या पटकन कशी काय केली याचा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच ना? वि : हो सर. शि: मग पहा त्याने ही बेरीज कशी केली ! त्याने प्रथम 1 ते 100 अंक एका सरळ रेषेत लिहिले. नंतर खालच्या ओळीत याच 1 ते 100 अंकांमध्ये उलट्या क्रमाने 100 ते 1 हे अंक मिळवले. पहा. या सर्व संख्यांची बेरीज ही 101 च आली आहे. याचाच अर्थ हे 101 शंभर वेळा झाले. म्हणून त्याने 101 × 100 केले. पण ही 1 ते 100 या संख्यांची दोनदा बेरीज झाली म्हणून त्याने 101 × 100 ला 2 ने भागले. तर 101 × 50 झाले. याचा त्याने गुणाकार केला तर त्याचे उत्तर आले 5050. पाहिलंत, कसे युक्तीने कार्लने हे गणित पटकन सोडवले? याच युक्तीने तुम्हीही गणित सोडवू शकता.