बीजगणिताची पूर्वतयारी

असमानता

views

4:00
असमानता :- मुलांनो,आपण समानता म्हणजे काय किंवा ती कशी शोधायची याचा अभ्यास केला. आता आपण असमानता म्हणजे काय हे पाहूया. असमानता या शब्दावरूनच आपल्याला बोध होतो की ज्या राशी समान नसतात त्यांना असमान म्हणतात. उदा. 7 + 5 आणि 7 × 5 या पदावलींच्या किंमती अनुक्रमे 12 व 35 आहेत. म्हणजे त्या समान नाहीत. असमानता दाखवण्यासाठी “#” अशा चिन्हाचा उपयोग केला जातो. म्हणून ही गोष्ट आपण (7 + 5) # (7 × 5) अशा पद्धतीने लिहू शकतो. (9 – 5) # (15 ÷ 3) या पदावलींच्या किमती समान नाहीत. म्हणजेच दोन पदावलींच्या किमती लहान – मोठया आहेत. लहान मोठेपणा दाखवण्यासाठी ‘<, >’ ही चिन्हे वापरतो. म्हणून अशा चिन्हाचा वापर करूनही असमानता लिहिता येते. (9 – 5) ची किंमत 4 आणि (15 ÷ 3) ची किंमत 5 येते. तर 5 हे 4 पेक्षा मोठे आहेत. किंवा 4 पेक्षा 5 मोठे आहेत हे दाखवण्यासाठी आपण 5 > 4 किंवा 4 < 5 असे दाखवतो. म्हणून पर्यायाने (9 – 5) < (15 ÷ 3) किंवा (15 ÷ 3) > (9 – 5) असे दाखवून असमानता दाखवू शकतो.