बीजगणिताची पूर्वतयारी

वेगळी गणिते सोडवू

views

3:41
आता आपण पदावलीची काही वेगळी गणिते सोडवू. तुम्ही या पदावलीच्या जोड्यांमधील चौकटीतील अशी संख्या लिहा की ; त्यामुळे होणारे विधान बरोबर असेल. शि: (7 × 2) = ( - 6) आता सांगा या चौकोनात कोणती संख्या लिहावी लागेल? वि: 7 × 2 या पदावलीची किंमत 14 आहे म्हणून दोन्ही बाजू समान येण्यासाठी चौकटीत अशी संख्या शोधली पाहिजे की 6 वजा केल्यावर वजाबाकी 14 येईल. जर आपण 20 मधून 6 वजा केले असता वजाबाकी 14 येते. (20 – 6 = 14) म्हणून चौकटीत 20 ही संख्या लिहावी लागेल. म्हणून (7 × 2) = ( - 6) शि: अगदी बरोबर! आता (4 × 6) = (12 × ). इथे कोणती संख्या लिहाल? वि: बाई 4 ने 6 ला गुणल्यास 24 ही संख्या येते. दुसऱ्या कंसातील 12 ला जर 2 ने गुणले तर 24 हीच संख्या मिळेल. म्हणून(4 × 6) = (12 × ) शि: छान ! आता हे गणित पहा (24 ÷ 3) < (5 + ) (24 भागिले 3 हे 5 अधिक पेक्षा लहान आहे. ) मग या ठिकाणी कोणती संख्या असेल?