नैसर्गिक प्रदेश

नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर

views

3:49
विषुववृत्तापासून जसजसे आपण ध्रुवीय प्रदेशांकडे जातो, तसतसे जैवविविधतेतील बदल कमी होत जातात. त्यामुळे साधनसंपत्तीच्या उपलब्धतेबाबत मर्यादा येतात. याचा परिणाम मानवी व्यवसायांवरही होतो. म्हणून प्रथम आपण साधनसंपत्ती म्हणजे काय? हे समजून घेऊ. साधनसंपत्ती म्हणजे मानवाने आपले जीवन सुकर व सुखकर बनवण्यासाठी वापरलेली नैसर्गिक संसाधने होय. साधनसंपत्ती म्हणजे निसर्गात अस्तित्वात असलेले असे सर्व घटक जे मानवी जीवनात वापरले जातात. अशा या साधनसंपत्तीचा मानवी व्यवसायांवर परिणाम होत असतो. मान्सून प्रदेशात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्या ठिकाणी शेती व शेती पूरक व्यवसाय केले जातात. तर विषुववृत्तीय प्रदेशात जथे सदाहरित वने व उंच वृक्ष आहेत, अशा प्रदेशात वनोत्पाद्नावर आधारित व्यवसाय केले जातात. उदा. लाकूड कटाई, डिंक, मध, रबर, लाख गोळा करणे. इ. व्यवसाय तेथे चालतात. तर तैगा प्रदेशात मऊ लाकूड असणाऱ्या वनस्पती आढळतात. त्यामुळे तेथे लाकूडतोड हा व्यवसाय आढळतो. तसेच टुंड्रा प्रदेशात फक्त शिकार व मासेमारी करावी लागते. आणि गवताळ प्रदेशात पशुपालनाबरोबर अलीकडे शेतीही केली जाते. वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशांत पर्यावरण आणि उपलब्ध साधनसंपत्तीमध्ये खूप फरक असतो. साधनसंपत्तीचा वापर हा त्या-त्या प्रदेशांतील विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असतो. तसेच त्या प्रदेशाचा इतिहास व सांस्कृतिक जडण-घडण याचाही लोकजीवनावर प्रभाव पडलेला असतो.