आपल्या संविधानाची ओळख

राज्यकारभार म्हणजे काय

views

4:37
देशाच्या राज्य कारभारात कोणत्या बाबी सामावलेल्या असतात ते पाहू.देशाच्या सीमांचे रक्षण करणे, परकीय आक्रमणांपासून जनतेचे रक्षण करणे, दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना करणे या सर्वच बाबींबद्दल शासनाला कायदे करावे लागतात. आणि या कायद्यांच्या अंमलबजावणीतूनच शासन समाजामध्ये योग्य ते बदल घडवून आणते. त्यासाठी शासनाला योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात. आणि ते निर्णय सर्वांच्या हिताचे असणे आवश्यक असते. थोडक्यात आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतचे सर्व निर्णय घ्यावे लागतात. आणि हे निर्णय घेणे म्हणजेच राज्य कारभार पाहणे होय.