भौमितिक रचना Go Back कोणाची एकरूपता views 4:11 कोनाची एकरूपता : याआधी आपण पाहिले की ज्या रेषा समान लांबीच्या असतात किंवा जे रेषाखंड समान लांबीचे असतात, त्यांना आपण एकरूप रेषा किवा एकरूप रेषाखंड असे म्हणतो. आता आपल्याला कोनांची एकरूपता अभ्यासायची आहे. कोनाची एकरूपता (व्याख्या) : ज्या कोनांची मापे समान असतात, ते कोन एकरूप असतात. समान मापे असणारे कोन हे एकरूप कोन असतात. यावरून कोनाची एकरूपता ही कोनाच्या बाजूंच्या लांबीवर अवलंबून नसून ती कोनाच्या मापावर अवलंबून असते. वर्तुळाची एकरूपता: आता आपण वर्तुळाची एकरूपता पाहूया. व्याख्या : ‘जी वर्तुळे एकमेकांशी तंतोतंत जुळतात, त्यांना एकरूप वर्तुळे म्हणतात. ज्या वर्तुळाची त्रिज्या समान असते, ती वर्तुळे समान मापाची असतात, हे तुम्हांला माहिती आहे.आता तुम्हाला एकरूप रेषाखंड, एकरूप कोन व एकरूप वर्तुळे ही संकल्पना नक्की लक्षात आली असेलच! प्रस्तावना त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा गुणधर्म उदाहरणे सोडवूया त्रिकोण रचना त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूची लांबी कर्ण व एका बाजूची लांबी रेषाखंडांची एकरूपता कोणाची एकरूपता