मसावी लसावी

उजळणी

views

2:35
उजळणी : मुलांनो, मागील इयत्तेमध्ये आपण संख्यांच्या विविध प्रकारांचा अभ्यास केला होता. उदा. मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या यांविषयी आपण माहिती घेतली होती. आज आपण उजळणी म्हणून या संख्यांचा अभ्यास करून त्यावर आधरित काही प्रश्न सोडवू. मूळसंख्या :- ज्या संख्येचा 1 व तीच संख्या असे दोनच विभाजक असतात, अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. उदा. 7 व 11 या दोनही मूळ संख्या आहेत का ते पाहूया . त्यासाठी अगोदर 7 चे व 11 चे विभाजक लिहूया. 7 चे विभाजक आहेत 1 व 7 आणि 11 चे विभाजक आहेत 1 व 11. पहा 7 व 11 यांचे फक्त दोनच विभाजक आहेत 1 व तीच संख्या. म्हणून 7 व 11 या मूळ संख्या आहेत. शि: मग आता मला 51 ते 100 यांमधील मूळ संख्या कोणत्या ते कोण सांगेल बरं? वि: सर मी! 51 ते 100 मधील मूळसंख्या आहेत : 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. शि: छान! आणि सगळ्यात लहान मूळ संख्या कोणती आहे? वि: सर 2 शि: अगदी बरोबर!