सूर्य, चंद्र व पृथ्वी

ग्रहणे

views

3:34
ग्रहण म्हणजे सूर्यबिंब किंवा चंद्रबिंब झाकले जाणे होय. सूर्य व पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र आल्याने सूर्य बिंब झाकले जाते. चंद्र ज्यावेळी पृथ्वीच्या सावलीतून प्रवास करतो त्यावेळी चंद्रबिंब झाकले जाते. अशी स्थिती केवळ सूर्य, चंद्र व पृथ्वी हे तिन्ही खगोल जेव्हा एकाच रेषेत येतात तेव्हाच होते. सूर्य या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या पृथ्वी या ग्रहाभोवती तिचा चंद्र हा उपग्रहही फिरत असतो. मात्र पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5० चा कोन करते हे तुम्हांला या आकृतीत दिसत आहे. त्यामुळे चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला दोन वेळा छेदतो. प्रत्येक अमावास्येला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत शून्य 0० अंशाचा कोन असतो, तर पौर्णिमेला तो 180० असतो. ग्रहणे अमावस्येला व पौर्णिमेलाच होतात. असे असले तरीही प्रत्येक अमावास्या किंवा पौर्णिमेला सूर्य, चंद्र, पृथ्वी एका पातळीत व एका सरळरेषेत येत नाहीत. म्हणूनच प्रत्येक अमावास्येला व पौर्णिमेला ग्रहण होत नाही.