सूर्य, चंद्र व पृथ्वी Go Back प्रयोग views 4:15 आता सूर्यग्रहण कसे होते हे समजावून घेण्यासाठी एक प्रयोग करणार आहोत. यासाठी सर्वात प्रथम चिखलाचा किंवा चिकणमातीचा एक गोळा घ्या. आणि तो एका टेबलावर मध्यभागी ठेवा. आता या चिखलाच्या या गोळ्यात एक पेन्सिल उभ्या दिशेने म्हणजे तिचे टोक वरती येईल अशी रोवा. या पेन्सिलच्या टोकावर प्लास्टिकचा लहान चेंडू बसवा. हा चेंडू म्हणजे आपला चंद्र आहे असे समजा. आणि या चेंडूवर मध्यभागी पेन्सिलने एक वर्तुळ काढा. आता या चेंडूच्या मागील बाजुस १० ते १५ सेमी वर एक मोठा प्लास्टिकचा चेंडू ठेवा. हा चेंडू म्हणजे आपली पृथ्वी आहे. आता या मोठ्या चेंडूवर म्हणजे पृथ्वीवरही एक वर्तुळ काढा. हे वर्तुळ म्हणजे आपले विषुववृत्त आहे. मोठा चेंडू टेबलवर स्थिर राहण्यासाठी त्याखाली गोल रिंग्स किंवा कपड्याची चुंबळ ठेवा. आता आपण मोठ्या चेंडूवर जे वर्तुळ काढले आहे त्या विषुववृत्तासमोर छोट्या चेंडूवर म्हणजेच चंद्रावर काढलेले वर्तुळ येईल अशी मांडणी करा. आता सूर्य म्हणून विजेरी म्हणेच बॅटरी घ्या. ती साधारणतः चंद्रापासून एक फूट अंतरावर चंद्राच्या सरळरेषेत धरा. आता या विजेरीचा प्रकाश चंद्रावर सोडा. सूर्याच्या प्रकाशाला चंद्र आडवा आल्याने त्याची सावली पृथ्वीवर पडते. त्यामुळे सूर्यग्रहणे होतात. प्रस्तावना चंद्रकला ग्रहणे सूर्यग्रहण प्रयोग चंद्रग्रहण ग्रहण एक खागोलीय घटना