वृष्टी

सांगा पाहू भाग 1

views

4:03
वृष्टी म्हणजे केवळ पाऊस नव्हे. तर पाऊस हे वृष्टीचे एक रूप आहे. “आकाशातून किंवा ढगातून जमिनीकडे पाण्याचा द्रवरूपात किंवा घनरूपात होणारा वर्षाव म्हणजे वृष्टी होय.” तर आज आपण या पाठात वृष्टी आणि तिची रूपे यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत. हिवाळ्यात गवताच्या पात्यावर मोत्यासारखे थेंब चमकतात. पात्यांवर हे थेंब फक्त सकाळीच दिसतात. हिवाळ्यात सकाळी गवतावर किंवा शेतातून चालल्यास आपले कपडे गवतावरील पाण्याने ओले होतात.गवताच्या पात्यांवरील हे पाणी हवेतील बाष्पामुळे येते. रात्री किंवा पहाटे तापमान कमी झाल्याने गवताची पाती, झाडांची पाने खूप थंड होतात. त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन त्याचे जलकणांत रूपांतर होते. सांद्रीभवनाची ही क्रिया प्रत्यक्ष थंड पात्यांवर झाल्याने हे जलकण पात्यांवरच किंवा पानांवरच साचतात. सांद्रीभवन म्हणजे बाष्पाचे द्रवरूपात रुपांतर होणे होय.