वृष्टी Go Back सांगा पाहू भाग 2 views 3:39 लंडनमध्ये हिवाळयात दुपारपर्यंत असे धुके आढळते. गवताच्या पात्यांवरील हे पाणी हवेतील बाष्पामुळे येते. रात्री किंवा पहाटे तापमान कमी झाल्याने गवताची पाती, झाडांची पाने खूप थंड होतात. त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन त्याचे जलकणांत रूपांतर होते. सांद्रीभवनाची ही क्रिया प्रत्यक्ष थंड पात्यांवर झाल्याने हे जलकण पात्यांवरच किंवा पानांवरच साचतात. सांद्रीभवन म्हणजे बाष्पाचे द्रवरूपात रुपांतर होणे होय.मग आपल्याकडे हिवाळ्यात असे धुके दुपारपर्यंत का पडत नाही? हिवाळ्यातील काही दिवस सकाळी आपल्याकडे असे धुके पडते. मात्र, जसजसा दिवस चढत जातो, तसतसे तापमान वाढू लागते. तापमान नेहमी आधी भूपृष्ठाजवळ वाढते. या वाढत्या तापमानामुळे सूक्ष्म जलकणांचे परत बाष्पात रूपांतर होते व दुपार होण्यापूर्वीच धुके विरळ होऊन नाहीसे होते. त्यामुळे आपल्याकडे लंडनप्रमाणे दुपारपर्यंत असे धुके पडत नाही.गारपिटीमुळे घरे, झाडे, वाहने, विजेचे खांब, वीजवाहक तारा यांचेही नुकसान होते. गारपिटीचा माणसे, गुरे, पक्षी अशा सजीवांनाही धोका असतो. गारपिटीमुळे शेतातील पिके संपूर्णपणे मोडून पडतात. संत्रे, द्राक्षे, केळी यांच्या बागांचेही गारपिटीने नुकसान होते. सांगा पाहू भाग 1 सांगा पाहू भाग 2 वृष्टी गारा पाऊस आवर्त पाऊस आरोह किंवा अभिसरण पाऊस पर्जन्य मापक धुके, दव आणि दहिवर वृष्टीचे परिणाम