वृष्टी

पर्जन्य मापक

views

3:08
आज दिवसभरात किती मिलीमीटर पाऊस पडला? त्या पावसाचे प्रमाण कसे बरे काढीत असतील? तर त्यासाठी पर्जन्यमापक नावाच्या उपकरणाचा वापर केला जातो. पाऊस मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्यास पर्जन्यमापक म्हणतात.पर्जन्यमापक हे नरसाळे आकाराचे असून हे नरसाळे विशिष्ट व्यासाचे असते. म्हणजे त्याच्या तोंडाचा आकार हा ठरावीकच असतो. या नरसाळ्यात पडलेले पाणी पर्जन्यमापकात बसवलेल्या बाटलीत जमा होते. हे जमा झालेले पाणी मोजपात्राच्या साहाय्याने मोजले जाते. बाजूलाच मोजपात्र ठेवले आहे. एखादया प्रदेशात जास्त पावसाचे प्रमाण जास्त असेल तर ही नोंद दर तीन तासांनी घेतली जाते. या मोजपात्रावर 0, 5, 10, 20,---------अशा मिलीमीटरच्या खुणा केलेल्या आहेत. पाऊस मोजण्यासाठी हे उपकरण पावसाचे पाणी पर्जन्यमापकात जमा होताना कोणताही अडथळा येणार नाही अशा उघडया जमिनीवर 30 सेमी उंचीचा सपाट चौथरा बांधून त्यावर ठेवतात. त्यामुळे पावसाचे पाणी कोणत्याही प्रकारची बाधा न येता त्यामध्ये जमा करता येते.