जोडस्तंभालेख

जोडस्तंभालेख काढणे

views

3:56
जोडस्तंभालेख काढणे : मुलांनो दोन वेगवेगळ्या स्तंभालेखांची माहिती आपण एकाच आलेखात कशी दाखवू शकतो, हे आपण हया जोडस्तंभालेखांतून समजून घेतले. आता आपण दिलेल्या माहितीवरून जोडस्तंभालेख कसा काढायचा हे पाहूया. यासाठी हे उदाहरण पहा. उदा 1. या तक्त्यात एका शाळेतील मुलगे व मुलींची संख्या इयत्ता निहाय दिली आहे. चला तर मग, या दिलेल्या माहितीच्या आधारे जोडस्तंभालेख काढूया. आलेख काढण्यासाठी सर्वप्रथम प्रमाण निश्चित करावे लागते. हे प्रमाण आलेख कागदावर उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूस लिहिणे अत्यंत आवश्यक असते. त्याला प्रमाण हे शीर्षक द्यावे. मुलांनो, आलेख काढताना तो अतिशय काळजीपूर्वक आणि अचूकतेने काढावा लागतो. 1. प्रथम आलेख कागदावर ‘x’ – अक्ष, ‘y’ – अक्ष व त्यांचा छेदन बिंदू ‘o’ दाखवा. 2. आता दोन जोडस्तंभालेखांतील अंतर समान ठेवून x- अक्षावर इयत्ता दाखवा. 3. y – अक्षावर योग्य प्रमाणात मुलांची/मुलींची संख्या दाखवा. जसे 1 एकक = 10 मुले/ मुली. 4. ठरविलेल्या प्रमाणानुसार प्रत्येक इयत्तेतील मुलांच्या व मुलींच्या संख्या दाखवणाऱ्या स्तंभांची उंची ठरवा. मुलांच्या संख्येची उंची फिक्या रंगाने तर मुलींची गडद रंगाने दर्शविली आहे. इयत्ता 5 वी तील मुलांच्या संख्यांचा स्तंभ 57 पर्यंत दर्शवा. 5. आता आपण प्रथम इयत्तावार मुलांच्या संख्यांचा स्तंभ तयार करू. आणि त्यानंतर मुलींच्या संख्यांचा स्तंभ तयार करू. मग आता तुम्ही सांगा इयत्तावार मुलांची संख्या. त्यानुसार मी स्तंभ तयार करते. वि: सर इयत्ता 5 वीतील मुलांची संख्या आहे: 52, इयत्ता 6 वीतील 68, 7 वीतील 67, 8 वीतील 50, 9 वीतील 62 आणि 10 वीतील 60. शि: छान हे झाले आपले मुलांच्या संख्यांचे स्तंभ. आता आपण मुलींच्या संख्यांचे स्तंभ तयार करू. कोण सांगेल संख्या ? वि: सर 5 वीतील मुलींची संख्या आहे: 57, इयत्ता 6 वीतील 63, 7 वीतील 64, 8 वीतील 48, 9 वीतील 62 आणि 10 वीतील 64. शि: छान! हे पहा झाले आपले मुलींच्या संख्यांचेही स्तंभ. तर मुलांनो अशा प्रकारे तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे जोडस्तंभालेख काढू शकता.