बैजिक राशी Go Back चल, सहगुणक (Coefficient) व पद views 5:18 चल, सहगुणक (Coefficient) व पद : मुलांनो आता आपण चल, सह्गुणक व पद म्हणजे काय ते पाहणार आहोत. उदा. पहा 3xy ही एक राशी आहे. या राशीमध्ये x व y हे दोन चल आहेत व 3 हा सह्गुणक आहे. याचाच अर्थ असा की, चलाच्या सोबत असणाऱ्या अंकाला सहगुणक असे म्हणतात. तसेच -15t या राशीमध्ये -15 हा t चा सह्गुणक आहे. आणि t हे चल आहे. पद सह्गुणक चल 11mn 11 mn -5X2 -5 x 5p/6 5/6 p x 1 x पद: एखाद्या राशीमध्ये जेव्हा गुणाकार ही एकच क्रिया असते त्या राशीला पद असे म्हणतात. उदाहरणार्थ: 24pq या उदाहरणात गुणाकाराचे चिन्ह नाही. मग आपण कसे ओळखणार बऱं? तर जेव्हा सह्गुणक आणि चल यामध्ये कोणतेही चिन्ह नसते तेव्हा तेथे गुणाकाराचे चिन्ह असते असे समजले जाते. म्हणून 24pq या राशीत जरी चिन्ह नसले तरी त्यामध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे. गुणाकार रूपात 24 x p x q असे होईल म्हणून 24pq हे एक पद आहे. प्रस्तावना चल, सहगुणक (Coefficient) व पद बैजिक राशींचे प्रकार बैजिक राशींची बेरीज द्विपद राशीची बेरीज बैजिक राशींची वजाबाकी बैजिक राशींची उदाहरणे बैजिक राशींचा गुणाकार द्विपदीला द्विपदीने गुणणे एकचल समीकरण