बैजिक राशी

द्विपदीला द्विपदीने गुणणे

views

3:56
द्विपदीला द्विपदीने गुणणे :मुलांनो, आता आपण द्विपदीला द्विपदीने कसे गुणायचे ते पाहू.उदाहरण : एका आयताकृती शेताची लांबी आहे (2x + 7) मी. व रुंदी आहे (x + 2)मी. तर त्या शेताचे क्षेत्रफळ काढा. मुलांनो, आयताचे क्षेत्रफळ = लांबी X रुंदी. हे आपल्याला माहीतच आहे. आपल्याला लांबी आणि रुंदी दिलीच आहे. म्हणून या सूत्रानुसार क्षेत्रफळ = (2x + 7) X (x + 2) आहे. मग आता यांचा गुणाकार करूया. सर्वात आधी पहिल्या पदातील प्रत्येक पदाने दुसऱ्या पदातील प्रत्येक पदाला गुणू. म्हणून (2x + 7) X (x + 2) = 2x (x + 2) + 7(x + 2) = 2x2 + 4x + 7x + 14 = 2x2+ 11x + 14म्हणून, आयताकृती शेताची क्षेत्रफळ: 2x2+ 11x + 14.चौ.मी आहेमुलांनो प्रत्येक उत्तराला एकक लिहिणे अत्यंत आवश्यक आहे.