भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल

राजकीय नेतृत्व

views

2:34
लोकशाही शासन व्यवस्थेत परराष्ट्र धोरण ठरविताना त्यात अनेक व्यक्तींचा वाटा असतो. उदा. राष्ट्रपती, पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांसारख्या देशाच्या प्रमुख पदी असणाऱ्या व्यक्तींचा त्यात समावेश असतो. या व्यक्ती परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न करतात. उदा. पंडित नेहरू प्रधानमंत्री असताना त्यांनी आपल्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर घातली, म्हणजे भारत कोणत्याही गटात सामील न होता अलिप्त राहून आपला विकास करेल हे धोरण त्यांनी स्वीकारले. पुढे अटलबिहारी वाजपेयी यांनी भारत – चीन संबंध सुधारण्यात मोठे योगदान दिले. म्हणजे परराष्ट्र धोरणावर त्या त्या वेळच्या राजकीय नेतृत्वाचा प्रभाव पडत असतो.