भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल

भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा

views

5:09
भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करताना त्याचा दोन टप्प्यांमध्ये अभ्यास करावा लागेल. पहिला टप्पा :- १९४७ (स्वातंत्र्यापासून) ते १९९० पर्यत 2. दुसरा टप्पा :- १९९० ते आजपर्यंतचा काळ. सुरुवातीचा टप्पा:- मुलांनो, आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी परराष्ट्र धोरणाची आखणी सुरुवातीच्या काळात केली. परराष्ट्र धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादास विरोध केला. म्हणजे कोणत्याही देशाने इतर देशांमध्ये वसाहती स्थापन करून त्या राष्ट्राला गुलाम बनविणे, याला त्यांनी विरोध केला . राष्ट्राराष्ट्रांमध्ये मैत्रीची भावना निर्माण होण्यासाठी आंतरराष्ट्रवादी भूमिका घेऊन जागतिक शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य दिले. या काळात भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रामुख्याने तीन बाबींचा प्रभाव होता. 1. सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आकलन कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय, स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न केला. शांतता हे नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य राहिले आहे. 2. भारताशेजारील दोन राष्ट्रे चीन व पाकिस्तान यांच्यापासून असणारे धोकेही विचारात घेण्यात आले. 3. स्वावलंबनाचा आग्रह म्हणजे आपल्या देशातील बहुतांशी लोकांच्या गरजा देशातच पूर्ण व्हाव्यात. त्यावर असणारा परराष्ट धोरणाचा भर हेही त्यावेळच्या परराष्ट धोरणाचे वैशिष्ट्य होते. अगदी सुरुवातीच्या काळात भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाद्वारे आशिया खंडातील देशांबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. आपल्याच खंडातील राष्ट्रांशी सहकार्य करून आपल्याबरोबर त्यांचाही विकास साधण्याचा व त्याबरोबर आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न या काळात झाला. ही भारताने विकसित केलेली प्रादेशिक विकास किंवा क्षेत्रीय विकासाची कल्पना पुढे आफ्रिका खंडापर्यत पसरली. आफ्रिका खंडातीलही राष्ट्रे एकमेकांना सहकार्य करून विकास करू लागली. परंतु, हा काळ शीतयुद्धाचा होता. त्यामुळे आशिया खंडातील व आफ्रिका खंडातील काही देश अमेरिका व सोव्हिएत युनियन यांच्या शीतयुद्धा वेळीच्या लष्करी संघटनाचे सदस्य झाले. त्यामुळे प्रादेशिक विकासाची प्रक्रिया थांबली. पुढे काही काळाने जे देश शीतयुद्धातील लष्करी संघटनांमध्ये समाविष्ट झाले नाहीत, त्यांनी अलिप्ततावाद संकल्पनेला पाठिंबा दिला. ह्याचा पुरस्कार भारताने केला होता. शांतता व स्वातंत्र्य ही दोन तत्वे अलिप्ततावादी धोरणाची मूलभूत तत्त्वे झाली.