बाह्यप्रक्रिया भाग – 1

सांगा पाहू माहिती विविध खडकांची

views

3:33
खडक एकसारखे न दिसता ते वेगवेगळ्या आकाराचे आहेत. तसेच ते तुटलेले, फुटलेले, तडा गेलेले, छिद्रे पडलेले तसेच काही ठिकाणी सजीवांच्या पोखरण्यामुळे खडक फुटलेले दिसत आहेत. दिवसा कडक उन्ह असल्यामुळे दगड तापत असावेत आणि रात्री तापमान कमी झाल्यावर थंड होत असावेत. तापमानातील या सततच्या बदलांमुळे खडक फुटत असावेत. किंवा समुद्र किनाऱ्यावरील खडकांवर समुद्राच्या लाटा वारंवार येऊन आपटत असल्यामुळे खडक फुटत असावेत. हवेतील दमटपणामुळे व उष्णतेमुळे शिल्प ज्या दगडांपासून बनवले गेले आहे, त्या दगडांना छिद्रे पडली असावीत. त्यामुळे ते सुंदर शिल्प विद्रूप झालेले असावे. किडे, मुंग्या, उंदीर, घूस यांसारखे प्राणी सातत्याने स्वतःच्या निवाऱ्यासाठी व अन्नाच्या शोधात जमीन पोखरतात. त्यामुळे काही ठिसूळ दगडांना छिद्रे पडली असावीत. काही कालावधीनंतर त्याचे तुकडे होत असावेत.