बाह्यप्रक्रिया भाग – 1 Go Back द्रवीकरण views 3:50 रासायनिक विदारणाचा दुसरा प्रकार म्हणजे द्रवीकरण होय. मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात. त्यात असलेल्या क्षारांपासून रासायनिक अवक्षेपण होऊन चुनखडी तयार होते. अवक्षेपण म्हणजे एखाद्या द्रावणातील विरघळलेला घनरूप पदार्थ द्रावणातून परत घनरुपात येण्याची क्रिया होय. म्हणजेच याठिकाणी खडकातील खनिजे पाण्यात विरघळून त्यांचे द्रावण तयार होते आणि परत ती पाण्याचे बाष्पीभवन होऊन एखाद्या ठिकाणी घनरूपात साचतात. उदा. :- अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव दर्या येथे चुनखडीचे पुन्हा रासायनिक अवक्षेपण झालेले आढळते. ही क्रिया सतत घडत असल्यामुळे खडकांतील क्षार विरघळून खडक ठिसूळ बनतात. असे खडक लगेच फुटतात. प्रस्तावना सांगा पाहू माहिती विविध खडकांची कायिक विदारण (भाग 1) कायिक विदारण (भाग 2) रासायनिक विदारण द्रवीकरण विस्तृत झीज