घरोघरी पाणी

गावाचा पाणीपुरवठा

views

3:51
आपल्या रोजच्या गरजेसाठी आपल्याला पाणीपुरवठा करणारे तलाव, नदया, धरणे हे स्त्रोत आहेत. म्हणजेच यातील पाण्याचा वापर आपण करतो. ही पाण्याची ठिकाणे आपल्या घरापासून बऱ्याच अंतरावर असू शकतात. तेथून थेट पाणी आपल्या घरी आणण्यात बऱ्याच अडचणी येत असतात. शिवाय हे पाण्याचे स्त्रोत खुले असतात. त्यामुळे त्यातील पाणी जसेच्या तसे पिण्यासाठी वापरता येईल याची खात्री देता येत नाही. कारण ते पाणी निर्धोक केलेले नसते. म्हणून गावाजवळचा एखादा मोठा जलस्त्रोत पाहतात व त्यातील पाणी कालवा किंवा जलवाहिनीच्या मदतीने संबध गावासाठी एका ठिकाणी आणतात. तेथे ते पाणी पिण्यासाठी निर्धेाक करतात. याला जलशुद्धीकरण असे म्हणतात. जलशुद्धीकरण केंद्रातून ते पाणी गावातील सर्वांना पुरविण्याची सोय करतात. याला जलवितरण असे म्हणतात.