वजाबाकी

चार अंकी संख्यांची बिनहातच्याची वजाबाकी

views

4:06
चार अंकी संख्यांची बिनहातच्याची वजाबाकी : मुलांनो, आता आपण चार अंकी संख्यांची बिनहातच्याची वजाबाकीची काही उदाहरणे सोडवू. उदाहरण १ :एका गावामध्ये ४५२६ पुरूष व ३२१४ स्त्रिया आहेत. तर त्या गावामध्ये पुरूषांची संख्या किती अधिक आहे? उत्तर :- मुलांनो, आतापर्यंत आपण ज्या पद्धतीने वजाबाकीची उदाहरणे सोडवली आहेत त्याच पद्धतीने इथेही वजाबाकी करायची आहे. हे गणित सोडवताना आपल्याला पुरुषांच्या संख्येतून स्त्रियांची संख्या वजा करावी लागेल. म्हणजेच ४५२६ या संख्येतून ३२१४ ही संख्या वजा करावी लागेल. प्रथम उभ्या मांडणीत हे गणित लिहू. पहा ६ एककांमधून ४ एकक वजा केले तर २ एकक शिल्लक राहिले, २ दशकांमधून १ दशक वजा केल्यास १ दशक शिल्लक राहिले. आता ५ शतकांतून २ शतक वजा केल्यास ३ शतक शिल्लक राहिले. आणि शेवटी ४ हजारातून ३ हजार वजा केल्यास १ हजार शिल्लक राहिले. म्हणून पुरूषांची संख्या १३१२ ने अधिक आहे.