नाणी व नोटा Go Back २० रुपयांचे सुटे करायचे म्हणजे views 2:35 २० रुपयांचे सुटे करायचे म्हणजे: शि: मुलांनो, २० रुपयाची मोड करताना ५ रुपयाची ४ नाणी, १० रुपयांची दोन नाणी किंवा नोटा किंवा १० रुपयाचे एक नाणे व ५ रूपयांची दोन नाणी घेऊ शकतो. २० रुपयांची मोड आपण आणखी वेगळया पद्धतीने करू शकतो: २० रुपयांची मोड करण्यासाठी आपण १ रुपयांची २० नाणी वापरू शकतो, ५० पैशांची ४० नाणी वापरू शकतो. १० रुपयांची एक नोट व २ रुपयांची ५ नाणी वापरू शकतो. १० रुपयांची एक नोट, ५ रुपयांची एक नोट, २ रुपयांची २ नाणी व १ रुपयाचे एक नाणे असे घेऊ शकतो. किंवा २ रुपयांची १० नाणी वापरू शकतो. ५ रुपयांची ३ नाणी व १ रुपयाची ५ नाणी घेऊ शकतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण २० रुपयाचे सुटे करू शकतो. नाणी व नोटा यांची मोड २० रुपयांचे सुटे करायचे म्हणजे सरावासाठी उदाहरणे