नाणी व नोटा Go Back सरावासाठी उदाहरणे views 2:42 आता आपण अशाच काही उदाहरणांचा सराव करू. शि: ५० रुपयांचे सुट्टे हवे आहेत. वि: सर ५ रुपयांच्या १० नोटा, १० रुपयांच्या ५ नोटा, २ रूपयांची २० नाणी व १० रूपयांचे १ नाणे असे सुट्टे घेऊ शकतो. शि: २०० रुपयांचे सुट्टे हवे आहेत. वि: सर २०० रुपयांचे सुट्टे करण्यासाठी ५० रुपयांच्या ४ नोटा लागतील. १०० रुपयांच्या २ नोटा लागतील. १ रुपयांची २०० नाणी लागतील. ५ रू ची ४० नाणी लागतील. शि: अगदी बरोबर! बरं सांगा अजयकडे ९ नोटा आहेत. त्या सर्वांची एकूण किंमत ५०० रुपये आहे. तर त्याच्याकडे कोणत्या किमतीच्या किती नोटा असतील? वि: सर अजयकडे १०० रुपयांची १ नोट, ५० रुपयांच्या ८ नोटा असतील. कारण येथे नोटांची संख्या ९ आहे व दिलेली रक्कम ५०० आहे. शि: शाब्बास ! बर सांगा, स्वातीकडे काही १०० रुपयांच्या, काही ५० रुपयांच्या व काही २० रूपयांच्या नोटा आहेत. सर्व नोटाची एकूण किंमत ५०० रू आहे. तर तिच्याकडे प्रत्येक प्रकारच्या किती नोटा आहेत? शि: स्वातीकडे २० रुपयांच्या ५ नोटा म्हणजे १०० रुपये आणि ५० रुपयांच्या ४ नोटा म्हणजे २०० रुपये आणि १०० रुपयांच्या २ नोटा म्हणजे २०० रुपये असतील. नाणी व नोटा यांची मोड २० रुपयांचे सुटे करायचे म्हणजे सरावासाठी उदाहरणे