उत्क्रांती

प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे

views

2:15
सजीव सृष्टीच्या निर्मितीची सुरवात ही आदिजीव या एकपेशीय प्राण्यापासून झाली. म्हणजेच ज्या प्राण्यांचे शरीर एकाच पेशीपासून बनलेले असते अशा प्राण्यापासून झाली. उदाहरणार्थ अमिबा अमिबाचे शरीर हे एका पेशीचेच बनलेले असते आणि त्याच्या सर्व क्रिया ह्या एका पेशीतच घडत असतात. आणि पुढे या एकपेशीय सजीवांतूनच बहुपेशीय सजीव निर्माण झाले. बहुपेशीय सजीव म्हणजे ज्या सजीवांचे शरीर हे अनेक पेशींनी बनलेले असते असे सजीव. वनस्पती तसेच मानवाचे शरीर हे अनेक पेशींनी बनलेले असते. म्हणून ते बहुपेशीय आहेत. हे बहुपेशीय सजीव हळूहळू उत्क्रांत होत गेले आणि या उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये विविध वर्गातील वनस्पतींची आणि प्राण्यांची निर्मिती झाली.