संसदीय शासन पद्धतीची ओळख

संसदीय शासन पद्धती भाग २

views

3:50
संसदीय शासनपद्धतीत कार्यकारी मंडळ कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते. याचा अर्थ जोपर्यंत कायदेमंडळाचा कार्यकारी मंडळाला पाठिंबा असतो, अथवा संमती असते तोपर्यंतच कार्यकारी मंडळ म्हणजेच प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ अधिकारावर राहते. कायदेमंडळाला किंवा संसदेला जर असे वाटले की कार्यकारी मंडळ योग्य रीतीने कार्य करत नाही, तर संसद अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करते. त्यांना सत्तेवरून पाय उतार व्हावे लागते. म्हणून अविश्वासाचा ठराव हे प्रधानमंत्री व मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवणारे एक प्रभावी साधन आहे. यामुळे प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ मनमानी कारभार करू शकत नाहीत. संसदीय शासन पद्धतीत संसद किंवा कायदेमंडळ श्रेष्ठ असते. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी, ज्यांना आपण खासदार म्हणतो, ते त्यांच्या विभागातील सामान्य जनतेच्या अपेक्षा संसदेत व्यक्त करतात. संपूर्ण देशातील लोकांचे हित कशात आहे, व त्यासाठी काय केले पाहिजे ते संसदेत ठरविले जाते. लोकसभा हे लोकांच्या प्रतिनिधींचे सभागृह असल्याने व जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेचा दर्जा श्रेष्ठ असतो.