भारताची संसद Go Back शोधा पाहू! views 3:15 आपल्याला माहीत आहे की लोकसभेत विविध घटकराज्यांचे उमेदवार निवडून जातात. सर्व घटकराज्यांना समान जागा मिळत नाहीत, तर घटक राज्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेतील जागा मिळतात. म्हणजेच, एखादया राज्याची लोकसंख्या जास्त असेल त्या घटकराज्यास जास्त जागा मिळतात. तर लोकसंख्या कमी असेल तर जागा कमी मिळतात. निवडणुकीसाठी प्रत्येक राज्याचे भौगोलिक मतदारसंघात विभाजन केले जाते. मतदारसंघाची लोकसंख्या साधारणतः सारखी असते. विविध घटकराज्यांना लोकसभेत किती जागा आहेत हे आपण आंतरजालाच्या म्हणजे इंटरनेटच्या मदतीने शोधून काढू. उदा. महाराष्ट्र : ४८ जागा. गुजरात : २६ जागा, मध्यप्रदेश : २९ जागा, उत्तरप्रदेश : ८० जागा, गोवा : २ जागा पहा या संख्येवरून आपल्या लक्षात येईल की, ज्या राज्याची लोकसंख्या जास्त त्या राज्यास जास्त जागा मिळतात, तर ज्या राज्याची लोकसंख्या कमी त्यांना कमी जागा मिळतात. प्रस्तावना, लोकसभा राज्यसभा शोधा पाहू! संविधान दुरूस्ती लोकसभेचे अध्यक्ष विधेयकाचे कायदयात रूपांतर होण्याची प्रक्रिया हे समजून घ्या!