कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल

सांगा पाहू: (टपाल चित्रे – भाग १)

views

4:01
प्रत्येक देशाच्या टपाल तिकिटांतून त्या त्या देशाची एक ओळख जगाला होत असते. आपल्या देशातील महत्त्वपूर्ण घटना, महत्वाचे उद्योगधंदे, नवीन सुधारणा दर्शवणारी टपाल तिकिटे वेळोवेळी छापली जातात. तसेच त्या त्या देशातील वैशिष्ट्यपूर्ण फळे-फुले, प्राणी-पक्षी-वृक्ष हेही टपाल तिकिटांवर विराजमान झालेले दिसतात. तर थोर नेते, कलावंत, खेळाडू यांचा सन्मान म्हणून त्यांचे चित्र टपाल तिकिटावर छापले जाते.आता तुमच्या पुस्तकातील ही टपाल तिकिटे पहा: पहिल्या तिकिटावर कापड विणाई उद्योगाचे चित्र आहे. कापडगिरणीत यंत्रावर तयार होणारे कापडाचे प्रचंड तागे त्यात दिसत आहेत. कापड उद्योग हा भारतातील एक महत्त्वाचा उद्योग समजला जातो.दुसरे तिकीट आहे: भारतातील टेलिफोन सेवेला १०० वर्षे पूर्ण झाल्याचे सांगणारे. ह्या तिकिटात जुन्या काळातील धातूच्या टेलिफोनचे चित्र काळ्या रांगत छापले आहे. तर आधुनिक काळातील इलेक्ट्रॉनिक्स टेलिफोन यंत्र वास्तव रंगात दाखवले आहे. त्यातून टेलिफोनमध्ये झालेला फरक व प्रगतीही समजते आणि देशात आज १०० वर्षे टेलिफोन सेवा उपलब्ध आहे हेही कळते. तिसरे तिकीट: भारतातील टपाल सेवेने १०० वर्षे पूर्ण केल्यानिमित्त छापलेले आहे. त्या तिकिटावर टपालसेवा सुरु झाल्याचे साल १८५४ असे नोंदवले आहे. या तिकिटात संदेशवहनासाठी पूर्वी वापरले जाणारे कबूतर आधी दाखवले असून पुढे विमान दाखवले आहे. त्यातूनही संदेशवहनात काळाच्या ओघात कसा फरक पडला हे समजते. आता आधुनिक काळात टपाल वहनासाठी विमानांचा उपयोग होतो.चौथे तिकीट आहे: रेल्वेचे विद्युत इंजिन दाखविणारे. पूर्वी कोळशावर चालणारी वाफेची इंजिने आगगाडीसाठी वापरली जात. इलेक्ट्रिक इंजिन ही सुधारणा असल्याने त्याचे चित्र टपाल तिकिटावर आले.पाचवे तिकीट आहे: शेती आणि शेतकरी यांचे चित्र असलेले. त्यावर जय किसान असे शब्द आहेत. १९६५ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी तेव्हाचे आपले पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांनी ‘जय जवान – जय किसान’ असा नारा दिला होता. देशाचे रक्षण करणारे जवान आणि देशाला अन्नधान्य निर्मितीत स्वयंपूर्ण करण्यासाठी झटणारे किसान ह्या दोघांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी देशवासीयांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानिमित्त जारी केलेले हे तिकीट आहे.