कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल

सांगा पाहू

views

4:09
पूर्वी कुटुंबात माणसे काही कारणाने कुटुंबापासून दूर गेली की, ती कुटुंबातील माणसांशी पत्राने किंवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधत असत. तर अलीकडे यात प्रगती होऊन इंटरनेटद्वारे कुटुंब सदस्य एकमेकांशी लांब राहूनही संपर्क साधतात. उदा: मेसेज, व्हॉट्सअॅप, फेसबुक, व्हिडिओ कॉलिंग यांसारख्या संपर्क माध्यमांच्या साधनांद्वारे ते एकमेकांशी संपर्क साधतात. या आधुनिक काळातील संपर्क माध्यमांमुळे जग जवळ आले आहे. पूर्वी युरोपमधून भारतात टपाल बोटीने येत असे. तेव्हा ते पत्र मिळायला काही महिन्यांच्या कालावधी जायचा. मग विमानाने पत्र चार-आठ दिवसांत मिळू लागले. आज आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलो तरी व्हिडीओ कोंन्फरन्सद्वारे कोणाशीही कोठेही संवाद करू शकतो. एकमेकांना पाहू शकतो. यावरून आपल्याला समजते की, जग किती जवळ आले आहे. जुन्या काळापासून आजपर्यंत कुटुंबाच्या स्वरूपात अनेक बदल झाले आहेत. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी अन्नाच्या शोधात भटकंती करणारा मानव शेतीच्या शोधानंतर एका जागी स्थिरावला. तो शेतीतून स्वत:ची उपजीविका करू लागला. आपल्याला माहीत आहेच की शेतीतील कामे करण्यासाठी खूप माणसे लागतात. माणसांची ही गरज भागविण्यासाठी नात्या गोत्यातील अनेकजण एकत्र राहत असत. उदा: आजोबा, त्यांचे भाऊ, त्यांची मुले व त्यांची मुले अशी सर्वजण एकत्र राहत असत. या सगळ्यांचे मिळून मोठे कुटुंब बनत असे.